मध्ययुगीन शिल्पकला शाळा (Medieval School of Sculpture)
Medieval School of Sculpture, पल्लव काळातील शिल्पे ,राष्ट्रकूट शिल्प ,चोल शिल्प ,चंदेल शिल्पे ,पाल शिल्पे ,पूर्वेकडील गंगा शिल्पे ,पश्चिम भारतातील संगमरवरी शिल्प , होयसाळ शिल्प, विजयनगर साम्राज्य शिल्प ,नायक शिल्पे , मुघल शिल्पे , Pallava Sculptures, Rashtrakuta Sculptures, Chola Sculptures, Chandel Sculptures, Pala Sculptures, Eastern Ganga Sculptures, Western Indian Marble Sculptures, Hoyasala Sculptures, Vijayanagara Empire Sculptures, Nayak sculptures, Mughal sculptures , UPSC notes in Marathi
- या काळात शास्त्रीय प्रतिष्ठा, संयम आणि साधेपणाऐवजी, शिल्पकला आता अधिकाधिक अलंकाराकडे झुकू लागल्या . अर्धा मानव, अर्धा राक्षस अशा विचित्र आणि असामान्य काल्पनिक प्राण्यांसह अत्यंत अलंकृत कलाकृती रेखाटल्या जाऊ लागल्या
- कला शैलीच्या या नवीन स्वरूपाचे वैशिष्ट्य म्हणजे कौशल्य आणि अभिरुचीत नसले तरी अभिजात कलेच्या दृष्टिकोनातील फरक. सुरुवातीच्या शास्त्रीय काळातल्या कलाकारांप्रमाणेच प्रेमळपणा आणि आदर्शीकरण ही अजूनही कलाकारांची आवड असली तरी अलंकृत, सजावटीच्या तपशीलांसाठीचा आग्रह थोडा निवळला.
या काळातील शिल्पांच्या या स्वरूपाची उदाहरणे:
- या काळातील शिल्पकलेच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंपैकी एक म्हणजे पुणें जिल्ह्यातील कार्ले येथील भव्य प्रार्थनागृह किंवा चैत्य.
- ग्वाल्हेरमधील ग्यारसपूर येथील वृक्षिकेची वाकलेल्या स्थितीतील आकर्षक प्रतिमा
Medieval School of Sculpture – पल्लव काळातील शिल्पे
- कांचीच्या पल्लव शासकांच्या नेतृत्वाखाली अत्यंत महत्त्वाच्या कलात्मक चळवळीची सुरुवात झाली
- महिषासुरमर्दिनी, गिरीगोवर्धन चित्रपटल, अर्जुनाची तपश्चर्या किंवा गंगा उतरणे, त्रिविक्रम विष्णू, गजलक्ष्मी आणि अनातसायनम ही काही उत्कृष्ट शिल्पे आहेत.
- भारतीय कलेच्या इतिहासात, अर्जुनाच्या तपश्चर्येच्या दृश्यासारखे हत्तीच्या निरूपणाचे दुसरे उत्तम उदाहरण नाही.
- खगोलीय जग, ऐहिक जग तसंच प्राणीजगत निपुण कौशल्याने दाखवण्यात आलं आहे.
- या सर्व उदाहरणांमध्ये रचनेचा जोम अनन्यसाधारण आहे.
- सडपातळ आणि लवचिक अंगयष्टी आकृतीच्या उंचीवर प्रभाव पाडते .
- या राजवटीतील उत्कृष्ट कलाकृती म्हणजे महाबलीपुरममधील दुर्गा देवीची महिषासुरमर्दनासाठी सज्ज असलेली रेखीव मूर्ती.
- नंतरची पल्लव शिल्पे अधिकाधिक तपशीलवार होत गेली .
Medieval School of Sculpture – राष्ट्रकूट शिल्प
- ८ व्या शतकाच्या मध्यात चालुक्यांकडून सत्तेचे हस्तांतर राष्ट्रकुटांकडे झाले
- राष्ट्रकुटांनी वेरुळ मधील कैलास मंदिरात मध्ययुगीन भारतीय कलेचे वर्चस्व प्रस्थापित केले
- या मंदिरातील ठळक आणि भव्य कोरीवकाम राष्ट्रकूट शैलीतील भव्य प्रतिमा दर्शवते
- वेरुळ येथील गुहा क्रमांक 29 मधील सुंदर शिलाशिल्प शिव आणि पार्वतीचे लग्न समारंभ दर्शविते.
- वेरुळ येथील आणखी एक भव्य शिल्प म्हणजे कैलास पर्वतास हादरा देणारा रावण !
- एलिफंटा येथील महिषामूर्ती असलेले गुहा मंदिर हे राष्ट्रकूटांनी बांधलेले आणखी एक महान स्मारक आहे,
- शिव शंकरांची त्रिमूर्ती तीन भिन्न पैलूंचे प्रतिनिधित्व करते स्तब्ध असलेला मध्यवर्ती चेहरा सृष्टी निर्मात्याचे रुप दाखवतो.
- एकाच शरीरातून निघणारी तीन डोकी भगवान शिवाच्या तीन भिन्न पैलूंचे प्रतिनिधित्व करतात. शांत आणि प्रतिष्ठित देखावा असलेला मध्यवर्ती चेहरा त्याला निर्मात्याच्या रूपात दाखवतो. डावीकडील गंभीर चेहरा विनाशाचे रुप दाखवतो . तसेच उजवीकडचा शांत चेहरा पालंकर्त्याचे प्रतीक भासते
Medieval School of Sculpture – चोल शिल्प
- पल्लवांनंतर आलेल्या आणि दक्षिण भारतावर 9 ते 13व्या शतकापर्यंत राज्य करणाऱ्या चोलांनी तंजावर, गंगाई कोंडो चोलापुरम, दारासुरमा येथे महान मंदिरांची निर्मिती केली, जी त्यांच्या कलेचा खजिना आहे.
- तंजावर येथील बृहदीश्वर मंदिर हे चोल मंदिरांपैकी सगळ्यात परिपक्व आणि भव्य आहे,
- चोल कलेचा प्रसार सिलोनबरोबरच जावा आणि सुमात्राच्या कलेवर पडला .
- चोलांच्या काळात कांस्य शिल्पकलची परंपरा या काळात कला विकासाच्या उच्चतम टप्प्यावर पोहोचली
- या काळातील शिल्पकार त्यांच्या अभिजातपणा, संवेदनशीलता आणि संतुलनासाठी प्रसिद्ध आहेत.
- या काळात वास्तववाद आणि बारीक तपशीलांकडे दिलेले लक्ष अत्यंत परिपूर्णतेला पोहोचले. उदा: चेहर्यावरील हावभाव हे या काळातील सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य आहे (नटराज प्रतिमा)
Medieval School of Sculpture – चंदेल शिल्पे
- इ.स. 950 ते 1100 पर्यंत राज्य करणार्या चंदेलांनी मध्य भारतात खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिरासारखी भव्य मंदिरे बांधली.
- या मंदिरांमध्ये वैविध्यपूर्ण मानवी प्रतिकृती कोरल्या आहेत .जात तपशील तसेच हावभाव यांना प्राधान्य दिले गेले
- खजुराहोयेशील कला ही तर सौंदर्याची खाण आहे. ही शिल्पे भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट कलाकृती आहेत
Medieval School of Sculpture – पाल शिल्पे
- पाल शासकांच्या कारकिर्दीत , 730 ते 1110 या काळात बिहार आणि बंगालमधे कलेला मोठी चालना मिळाली.
- मुख्यत्वे त्यांची बौद्ध धर्मावर श्रद्धा होती.त्यांनी नालंदा आणि विक्रमशिला यांसारख्या शिक्षण केंद्रांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले,
- या काळात कला तांत्रिक परिपूर्णतेला पोहोचली. पाल शैली ही सडपातळ आणि सुंदर आकृत्या, विस्तृत दागिने आणि पारंपारिक सजावट साठीनावारूपास आली
- बिहारमधील शिल्पे बंगालमधील शिल्पांपेक्षा काहीशी जाड आणि अंगांच्या सामान्य प्रमाणात जड आहेत. पाल शासकांचे जावाशी घनिष्ट संबंध होते जे हिंदू-जावानीज शिल्पकला आणि नेपाळ, काश्मीर, ब्रह्मदेश आणि थायलंडच्या चित्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येतात.
- पश्चिम बंगालमधील महानडमधील कलाकृतीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे गंगा नदीची सुंदर प्रतिकृती. गंगामाता कल्पतरू झाडाखाली, कमळावर विराजमान झाली असून, तिच्या हातातील पाण्याने भरलेले पात्र हे समृद्धी आणिभरभराटीचे प्रतीक आहे.
Medieval School of Sculpture – पूर्वेकडील गंगा शिल्पे
- ७ ते १३व्या शतकापर्यंत ओडिशावर सत्ता गाजवणाऱ्या पूर्व गंगा राजवंशातील राजांनी भुवनेश्वर, पुरी आणि कोणार्क येथे असंख्य शिल्पांनी सजलेली अनेक स्मारक मंदिरे बांधली आहेत.
- 9व्या शतकाच्या मध्यापर्यंत, विशेषतः ओडिशात, शिल्पकलेची एक शाळा विकसित झाली,
- ओडिशाच्या मंदिरात स्रियांचे मोहक हास्य, दागिन्यांनी भरलेले विलासी केस इत्यादी तपशील दर्शवले गेले आहेत .
- कोणार्क येथील सूर्यदेवाला समर्पित प्रसिद्ध मंदिर 12 व्या शतकाच्या मध्यात नरसिंहवर्मनिन यांनी बांधले . सात घोड्यांच्या रथावर सूर्यदेव आरुढ झाले आहेत .
Medieval School of Sculpture – पश्चिम भारतातील संगमरवरी शिल्प
- पश्चिम भारतातील गुजरातमधील संगमरवरी शिल्पकलेची परंपरा माउंट अबू, गिरनार आणि पालिताना येथील जैन मंदिरांना सजवणाऱ्या गुंतागुंतीच्या कोरीव शिल्पांच्या विपुलतेमध्ये दिसते.
- विष्णूची चतुर्भूजी प्रतिमा, या काळातील कलेचे प्रतिनिधित्व करते.
- भगवान ब्रह्म आणि महेश यांच्या प्रतिकृती देखील पाहावयास मिळतात
- माउंट आबू येथील दिलवारा मंदिरे ही जैन परंपरेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत ही वास्तुकलेची स्मारके नसून, शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत.
Medieval School of Sculpture – होयसाळ शिल्प
- होयसाळ शिल्पकलेतील कोरीव कामाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्णाने उचललेल्या गोवर्धन पर्वताचे चित्रण.
- मानवी शरीराच्या सौंदर्याची महत्त्व हळूहळू कमी होऊन त्याची जागा भरगच्च अलंकारांनी घेतली
- हळेबिडू आणि बेलूर येथे दगडात बांधलेली मंदिरे या शैलीची उत्तम उदाहरणे आहेत.
- होयसाळ शिल्पे आकाराने काहीशी लहान असली तरी अत्यंथ आकर्षक आणि सुंदर आहेत.
Medieval School of Sculpture – विजयनगर साम्राज्य शिल्प
- दक्षिण भारतातील शेवटचे महान हिंदू राज्य विजयनगर होते. या शासनकाळात सुमारे १३३६ ते १५६५ या काळात ताडपत्री, हंपी, कांचीपुरम इत्यादी ठिकाणी अनेक सुंदर मंदिरे उभारण्यात आली.
- या मंदिरांमधील कोरीव काम चोल आणि चालुक्य कला परंपरा दर्शवितात. या काळात रामायण आणि कृष्णाच्या कथनात्मक स्वरूपातील सादरीकरण तसेच बाललीला हे आवडते विषय बनले.
- असेच एक उत्तम उदाहरण म्हणजे चिदंबरम येथील गोपुरांपैकी कृष्णदेवरायत.
- विजयनगर काळात (१३३६-१५६५) अलंकार अधिक विस्तृत बनले. मुद्रा अधिक कठोर झाल्या.
Medieval School of Sculpture – नायक शिल्पे
- १७ वे शतक हे मदुराई आणि तंजावर च्या नायक शिल्पकलेतला एक महत्त्वाचा कालावधी होता.
- या कालावधीत त्रिचिनपल्लीमय येथील श्रीरंगम मंदिरातील उत्कृष्ट शिल्पकलेमध्ये विलक्षण तपशीलांसह प्राण्यांचे चित्रण केले आहे .
- ही शिल्पकला शैलीबद्ध तसेच चैतन्यपूर्ण आहे.
- आक्रमक पवित्रा घेतलेले घोड्यांच्या जोडीचे चित्रण अतिशय प्रभावीपणे करण्यात आले आहे
Medieval School of Sculpture – मुघल शिल्पे
- दगडी शिल्पांची परंपरा चालू असली तरी मुघल आणि इतर मुहम्मद शासकांच्या काळात कोणतीही मोठी शिल्पकला चळवळ टिकली नाही.
- मुहम्मद शासकांच्या काळात स्थापत्यकलेला जरी मोठी चालना देण्यात आली असली , तरी नाविन्यपूर्ण शिल्पे क्वचितच आढळतात
- ब्रिटीश राजवटीत शिल्पकारांना योग्य आश्रय दिला गेला नाही परिणामी भारतीय कलेची संपूर्ण परंपरा जवळजवळ ठप्प झाली.
हे पण वाचा – बौद्ध शिल्प
UPSC बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा