आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास भाग १(Economic Growth and Economic Development Part 1)
Economic Growth and Economic Development , Real and nominal GDP, Real GDP, Limitations of GDP/Economic Growth Concept, Steps to be taken by the Government to ensure equitable growth, आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास, वास्तविक आणि नाममात्र वार्षिक उत्पादन, वास्तविक GDP, GDP/आर्थिक वाढीच्या संकल्पनेच्या मर्यादा, समान वाढ सुनिश्चित करण्यासाठी सरकारने उचलावयाची पाऊले, Economics in Marathi, मराठीत अर्थशास्त्र.
Economic Growth and Economic Development – वास्तविक आणि नाममात्र वार्षिक उत्पादन
नाममात्र GDP हे एका वर्षात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे मुद्रा मूल्य असते. नाममात्र GDP ची गणना सध्याच्या बाजारभावावर आधारित असते . वेळोवेळी बदलणाऱ्या किमतींमुळे नाममात्र जीडीपी अर्थव्यवस्थेची वास्तविक कामगिरी दर्शवत नाही
उदाहरणार्थ एखाद्या देशाची अर्थव्यवस्था केवळ एकाच वस्तूचे उत्पादन करीत असेल जसं की मोबाईल फोन – .समजा 2022 मध्ये, त्या देशाने 100 मोबाईलचे उत्पादन केले ज्यांची प्रत्येकी 10000 रुपये दराने विक्री झाली. अशा वेळी त्या देशाचा GDP RS 1000000 (100*10000) असेल.व २०२३ मध्ये, केवळ 90 मोबाईलचे उत्पादन झाल्यास , आणि त्यांची विक्री प्रत्येकी Rs15000 ने झाल्यास . २०२३ चा GDP 1350000 असेल.
ही RS 10,00000 वरून RS 1350000 पर्यंतची वाढ नाममात्र GDP आहे. त्या देशाचा GDP उत्पादनाच्या वाढीमुळे वाढला नसून मोबाईलच्या दरडोई किंमतवाढीचा परिणाम आहे
म्हणून, नाममात्र जीडीपी वास्तविक अर्थव्यवस्थेतील बदल अधोरेखित करत नाही.
Economic Growth and Economic Development – वास्तविक GDP
विशिष्ट निवडलेल्या आधारभूत वर्षात प्रचलित असलेल्या बाजारभावांच्या स्थिर संचाचा वापर करून वर्षभरात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे मुद्रा मूल्य म्हणजे वास्तविक GDP.
उदाहरणार्थ एखाद्या देशाची अर्थव्यवस्था केवळ एकाच वस्तूचे उत्पादन करीत असेल जसं की मोबाईल फोन – .समजा 2022 मध्ये, त्या देशाने 100 मोबाईलचे उत्पादन केले ज्यांची प्रत्येकी 10000 रुपये दराने विक्री झाली. अशा वेळी त्या देशाचा GDP RS 1000000 (100*10000)
असेल.व २०२३ मध्ये, केवळ 90 मोबाईलचे उत्पादन झाल्यास आणि 2011-12 हे वर्ष आधारभूत घेऊन मोबाईल ची किंमत ९००० घेतल्यास , वास्तविक GDP 90*9000 = 810000 असेल. म्हणजे नाममात्र GDP RS 1350000 आहे तर वास्तविक GDP RS 810000 आहे. हा फरक मूळ वर्षातील 90,000 वरून चालू वर्षात 15,00,00 रुपयांपर्यंत वाढलेल्या किमतींमुळे आहे.
Economic Growth and Economic Development – GDP/आर्थिक वाढीच्या संकल्पनेच्या मर्यादा
खालील उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की GDP हे अर्थव्यवशेचे परिपूर्ण माप नाही
- समजा, अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीमुळे तरुण गुन्हेगारीकडे वळतात. गुन्हेगारी दरावर मात करण्यासाठी, सरकार अधिक पोलिस कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेते. पोलिस कर्मचार्यांच्या नियुक्तीमुळे, अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रियाकलाप वाढतो कारण नवीन नियुक्त कर्मचार्यांना पगार दिला जातो, जो ते वस्तू आणि सेवा खरेदीवर खर्च करतील. त्यामुळे वस्तू आणि सेवांचे उत्पादन वाढेल. याचा अंतिम परिणाम म्हणजे जीडीपीमधील वाढ.
चुकीच्या कारणामुळे म्हणजेच गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ हे अर्थव्यवस्थेच्या गुणवतेचे प्रमाण मानले जाऊ शकत नाही. अशा कारणांना अधोरेखित करण्यात जीडीपी ही संकल्पना अयशस्वी ठरते
समजा एखाद्या खनिज संसाधनाच्या उत्खननासाठी त्या प्रदेशातील वृक्षतोडीमुळे पुराचा धोका निर्माण होतो . तसेच अशा प्रदेशातील लोकांचे पुनर्वसन हा देखील महत्वाचा प्रश्न उद्भवतो. पुरासारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास होणाऱ्या जीवित असेच मालमतेच्या हानीची गणना करण्यात जीडीपी असशस्वी ठरते.
Economic Growth and Economic Development – आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास
आर्थिक वाढ ही आर्थिक संकल्पना आहे. यात केवळ अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू आणि सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते . जीडीपी, दरडोई उत्पन्न, उत्पादन, रोजगार इत्यादी आर्थिक निर्देशकांच्या बाबतीत देशाने किती प्रगती केली आहे याचे मुल्यांकन यात केले जाते . यात केवळ परिमाणयोग्य परिणामांची मोजणी करण्यात येते .
Economic Growth and Economic Development – समान वाढ सुनिश्चित करण्यासाठी सरकारने उचलावयाची पाऊले
- भौतिक भांडवलाला चालना देण्याच्या धोरणांबरोबरच सरकारने मानवी भांडवलाच्या धोरणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. “भौतिक भांडवलाचा प्रचार हा विकासाभिमुख उपाय आहे, परंतु भौतिक भांडवलासह मानवी भांडवलाचा प्रचार हा विकासाभिमुख उपाय आहे”.
- कंपन्यांसाठी निरामय स्पर्धात्मक वातावरणास चालना देणे. तसेच क्रोनी कॅपिटलिझमचा प्रसार व प्रचार एन करणे
- एकाधिकारशाही प्रकारची रचना तयार करण्याबरोबरच अत्याधिक नियंत्रणमुक्तीचे धोरण ही विकासाभिमुख चाल आहे, परंतु नवीन कंपन्यांना वाजवी स्पर्धेद्वारे प्रोत्साहन देणे हा विकासाभिमुख उपाय आहे.”
- व्यवसाय कल्याणाला चालना देण्याच्या एकतर्फी उपायाच्या तुलनेत संसाधन पुनर्वितरणाकडे संतुलित दृष्टीकोन अधिक चांगला आहे. प्रादेशिक कल्याणाबरोबरच भूसंपादन हा विकासाचा उपाय आहे.
- कामगारांच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या सुधारणा हा विकासाभिमुख उपाय आहे.
थोडक्यात,”वाढ ही जरी एक आवश्यक अट असली तरी लोकांच्या कल्याणासाठी आणि लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पुरेशी अट नाही”.
हा लेख देखील वाचा – भारतीय आर्थिक वाढ: राष्ट्रीय उत्पन्न निर्धारण, GDP, GNP, NDP, NNP, वैयक्तिक उत्पन्न
UPSC बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा.