आधुनिक वास्तुकला | Modern Architecture UPSC

आधुनिक वास्तुकला (Modern Architecture UPSC)

Modern Architecture UPSC, आधुनिक वास्तुकला UPSC , UPSC study material in Marathi, Portugese architecture, French architecture, British architecture, Indo- Saracenic architecture, पोर्तुगीज आर्किटेक्चर, फ्रेंच आर्किटेक्चर, ब्रिटीश आर्किटेक्चर, इंडो- सारासेनिक आर्किटेक्चर

 

 

समकालीन वास्तुशास्त्रेची उत्क्रांती:

  • युरोपीयांच्या आगमनाने भारताच्या वास्तुकलेमध्ये वैविध्य आले .या काळात यूरोपीय वास्तुकला व समृद्ध स्थानिक कलेच्या मिश्रणाने नवीन कला विकसत झाली . 
  •  यूरोपीय वास्तुकल्पिय कलेचे नावीन्य प्रामुख्याने सार्वजनिक, नागरी आणि कार्यात्मक इमारती – डाक खाणे, रेल्वे स्थानक, विश्रामगृहे आणि सरकारी इमारतींमध्ये दिसून आले.

पोर्तुगीजांचा प्रभाव

  • चर्च, कॅथेड्रल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पोर्तुगीज स्थापत्य कलेची  आयबेरियन (Iberian)शैली ठळकपणे दिसून आली. 
  •  पश्चिम भारतातील प्रदेश विशेषत: गोवा, दमण आणि दीव हे पोर्तुगीज वसाहतीमुळे खूप प्रभावित झाले.
  • जुन्या गोव्यातील Basilica of Bom Jesus सारख्या प्रतिष्ठित संरचना पोर्तुगीज वास्तुकलेचे प्रतिनिधीत्व करतात  
  • Cathedral de Santa Catarina मध्ये Tuscan आणि Corinthian शैलींचे सुंदर मिश्रण आढळते.
  • पोर्तुगीज काळातील इतर उल्लेखनीय वास्तूंमध्ये Church of Saint Francis of Assisi, Convent of Santa Monica, Chapel of the Weeping Cross, आणि Sanctuary of Saint Joseph Vaz यांचा समावेश होतो
  •  इतर काही उल्लेखनीय वास्तूंमध्ये पश्चिम बंगालमधील Bandel Church  आणि मुंबईतील संरचना जसे की Madh Fort, Castella de Aguada, आणि St. John’s Baptist Church या वास्तू समाविष्ट आहेत.

फ्रेंच वास्तुकलेच्या पाऊलखुणा

  • फ्रेंच स्थापत्य शैलीत स्थानिक कला आणि पर्शियन वास्तुकलेची सांगड पाहावयास मिळते.
  • शटर खिडक्या, क्लिष्ट कमानदार कोरीवकाम आणि अरुंद रस्त्यावरील दर्शनी भाग यासारखी फ्रेंच वास्तुकलेची वैशिष्ट्ये अधोरेखित करण्याजोगी आहेत .
  • पुद्दुचेरी, बंगाल, कराईकल आणि माहे येथे या शैली विशेषतः आढळत
  • फ्रेंच शहरी नियोजनाची वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये म्हणजे ग्रीड पॅटर्न आणि लंबवत रस्ते. काही प्रसिद्ध वास्तूंमध्ये डुमास (Dumas) रस्त्यावरील Joan of Arc पुतळा , पुडुचेरीतील Mairie building , आणि फ्रेंच वाणिज्य दूतावास इमारत यांचा समावेश होतो.

इंग्रज वास्तुकलेचा वारसा

  • लखनौमधील कॉन्स्टँटिया सारख्या इमारतींद्वारे 18 व्या शतकात पॅलेडियन (Palladian) शैली सादर करण्याचे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते.
  • 19 व्या शतकात भारतीय व ब्रिटिश शैलीच्या मिश्रणाने नवीन शैली विकसित झाली जिचे प्रतिनिधित्व FS Growse सारख्या व्यक्तींनी  केले.
  • जयपूरमधील संग्रहालय आणि चेन्नईतील मूर मार्केट या उल्लेखनीय संरचना आहेत. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया हे मुघल व ब्रिटिश शैलीचे मिश्रण आहे. FW Stevens यांनी  संरचीत केलेल्या व्हिक्टोरिया टर्मिनस (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) स्टेशन मध्ये व्हिक्टोरियन गॉथिक शैलीची छाप दिसते

इंडो-सारासेनिक लाट

  • व्हिक्टोरियन युगाच्या आसपास , भारतात राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या टप्प्याची सुरुवात झाली. 
  • स्थानिक आणि इंडो-इस्लामिक स्थापत्य घटकांना गॉथिक पुनरुज्जीवन आणि व्हिक्टोरियन इंग्लंडमध्ये प्रचलित असलेल्या निओ-क्लासिकल (Neo classic) रचनांचे एकत्रीकरण झाले.

इंडो-सारासेनिक वास्तुशैलीचे मुख्य गुणधर्म 

कांद्यासारखे (Bulbous) घुमट

  • इंडो-सारासेनिक इमारतींचे वाखाणण्याजोगे वैशिष्ट्य.
  • कमानीतून विकसित होणारे हे घुमट सामान्यत: छताचे काम करते..
  • Egmore रेल्वे स्टेशन आणि चेन्नई संग्रहालय ही बल्बस डोम्स ची उल्लेखनीय उदाहरणे आहेत.

ओव्हरहँगिंग (Overhanging) इव्हस (छज्जा)

  • फतेपूर सिकरी येथील सलीम चिश्ती यांच्या मकबरासारख्या मुघल वासुकलांमध्ये याचे दर्शन घडते.
  • 19व्या आणि 20व्या शतकापर्यंत, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि राष्ट्रपती भवन यांसारख्या संरचनांमध्ये हे वैशिष्ट्य अंगीकारले गेले. 

व्हॉल्टेड (Vaulted) छप्पर

  • व्हॉल्टेड सीलिंग्समध्ये एकमेकांना छेदणाऱ्या कमानी असतात आणि त्या इस्लामिक कालखंडातील समाधींमध्ये प्रचलित आहेत.
  • ब्रिटीश वास्तुविशारदांनीही हे वैशिष्ट्य त्यांच्या भारतातील कार्यकाळात, चेन्नईतील St. Matthias’ Church सारख्या संरचनांमध्ये सम्मिलीत केले.

छत्री

  • छत्री ही भारतीय स्थापत्य रचनांमध्ये प्रचलित असलेल्या घुमटाच्या आकाराची रचना आहेत.
  • प्रमुख वास्तूंच्या कोपऱ्यांवर किंवा प्रवेशद्वाराच्या छतावर चिन्हांकित करणार्‍या शोभेच्या मंडपांची प्रचीती हुमायूनच्या थडग्यात दिसते.
  • इंडो-सारासेनिक शैलीनेही हे वैशिष्ट्य स्वीकारले, जे राष्ट्रपती भवनात दिसून आले.

मिनार

  • मिनार हा एक उंच बुरुज आहे, ज्यामध्ये अनेकदा शंकूच्या किंवा कांद्याच्या आकाराचा मुकुट असतो.
  • चेन्नईतील Senate House हे इंडो-सारासेनिक आर्किटेक्चरमधील मिनारांच्या संमिश्रणाचा दाखला देते

मंडप

  • मंडपाची रचना, एकतर विलग किंवा मुख्य इमारतीशी संलग्न असते.
  • मुघल शैलीनुसार , राजवाड्यांसारख्या भव्य निवासस्थानांमध्ये, मंडप स्वतंत्र रचना असू शकते 
  • इंडो-सारासेनिक शैलीच्या ब्रिटीश वास्तुशिल्प कलेत, असे मंडप, किल्ले आणि राजवाड्यांमध्ये आढळतात.

झुबकेदार कमानी (Cusped Arches)

  • 17व्या शतकाच्या उत्तरार्धात, भव्य कवच असलेली कमान मुघल रचनेचे वैशिष्ट्य बनली.
  •   चेन्नई कॉर्पोरेशन (Corporation) इमारत, राष्ट्रपती भवन आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये ब्रिटीश वास्तुविशारदांनी ही क्लिष्ट कमान रचना स्वीकारली, 

स्वातंत्र्योत्तर वास्तुकला

  • या काळातील वास्तुकला विशिष्ट शैलीच्या श्रेणीच्या पलीकडे जाते. या शैली मुख्यतः विज्ञान आणि आधुनिक बांधकाम तंत्रांशी सुसंगत होत्या.
  • या संदर्भातील एक अनोखा प्रयोग ली कॉर्बुझियर यांनी चंदीगडच्या विकासात केला. वाढत्या शहरी आव्हानांना तोंड देण्यासाठी शहराचे सुव्यवस्थित साचे विकसित केले गेले. (उदा: वाहतूक कोंडी)
  • केरळच्या सामूहिक गृहनिर्माण प्रकल्पात लॉरी बेकरचे योगदान उल्लेखनीय आहे. स्वस्तात घरे बांधण्यासाठी स्थानिक उपलब्ध साहित्याचा वापर केला गेला. इमारत पर्यावरण संवर्धनाशी सुसंगत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी अनेक पारंपारिक पद्धतींचा समावेश करण्यात आला.
  • साबरमती आश्रम, कांचनजंगा अपार्टमेंट टॉवर तसेच नवी मुंबईचे नियोजन करण्यासाठी गोव्यातील वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांनी बरेच योगदान दिले

 

त्याचप्रमाणे हे देखील वाचा – इस्लामिक वास्तुकला 

                                        – बौद्ध वास्तुकला 

UPSC बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply