सिंधू संस्कृतीची शिल्पे (Indus Valley Sculptures)
Indus Valley Sculptures , Seals, Metal casts, Dancing girl, Terracotta figurine, Pottery, Jewellery, UPSC notes in Marathi, सिंधू खोऱ्यातील शिल्पकला, सील, मेटल कास्ट, नृत्य करणारी मुलगी, टेराकोटाची मूर्ती, मातीची भांडी, दागिने
1. सील :
- बहुतांशी सील चौकोनी , त्रिकोणी , आयताकृती अथवा वर्तुळाकार होती .
- नदीच्या पात्रात आढळणाऱ्या स्टीटाइट या मऊ दगडापासून बहुतांशी बनवण्यात आली .
- यांवर चित्रलेखन लिपीतील शिलालेख आहेत ज्यातील मजकुराचा उलगडा होणे अजून बाकी आहे. लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात असावी , परंतु, द्वि-दिशात्मक लेखन शैली म्हणजे एका ओळीवर उजवीकडून डावीकडे आणि दुसर्या ओळीवर डावीकडून उजवीकडे देखील आढळली आहे.
- एकशिंगी, कुबड असलेला बैल, गेंडा, वाघ, हत्ती, म्हैस, बायसन, बकरी, मारकूर, आयबेक्स, मगर इत्यादि प्राण्यांचे रेखाटण दिसून येते . तथापि, कोणत्याही सीलवर गायीचा पुरावा अद्याप आढळला नाही.
- साधारणपणे, सीलच्या एका बाजूला प्राणी किंवा मानवी आकृती आणि विरुद्ध बाजूला शिलालेख किंवा दोन्ही बाजूला शिलालेख असत.
- अर्धा माणूस आणि अर्धा प्राणी सदृश आकृती चे चित्रण देखील आढळते.
- सील प्रामुख्याने व्यावसायिक कारणांसाठी वापरले जात. मृतदेहांवर छिद्र असलेले काही सील सापडले आहेत.या वरून असे अनुमान लावले जाते की यांचा वापर ताविज म्हणून केला gela असावा.
- काही शिक्क्यांवर भौमितिक प्रतिमा देखील सापडल्या आहेत, ज्या कदाचित शैक्षणिक हेतूंसाठी वापरल्या गेल्या असाव्यात . ‘स्वस्तिक’ चिन्ह असलेले शिक्केही सापडले आहेत.
- उदाहरणार्थ : पशुपती सील, युनिकॉर्न सील
-
Indus Valley Sculptures – पशुपती सील:
- मोहेंजोदारो येथे सापडलेल्या स्टीटाइट सीलमध्ये मानवी आकृती किंवा देवता मांडी घालून बसल्याचे दिसून येते .
- आकृतीच्या डाव्या बाजूला हत्ती आणि वाघ आहेत तर उजव्या बाजूला गेंडा आणि म्हैस दिसत आहेत.
- आकृतीच्या आसनाखाली दोन काळवीट आढळतात.
2. कांस्य आकृत्या:
-
- हडप्पा संस्कृतीत कांस्य पुतळे “अदृष्ट मेण तंत्र (Lost wax technique)” किंवा “Cire Perdue” वापरून बनवले गेले.
- या तंत्रात, मेणाच्या आकृत्यांना प्रथम ओल्या चिकणमातीने लेपले गेले. या आकृत्या कोरड्या झाल्यावर , आतील मेण वितळण्यासाठी गरम केल्या जात.
- नंतर मेण एका लहान छिद्रातून आकृतीमध्ये ओतले जाई आणि पोकळ साच्यात द्रव धातू ओतला जाई. धातू थंड आणि घट्ट झाल्यानंतर, चिकणमातीचे आवरण काढून टाकले जाई. त्यामुळे मेणाच्या आकृतीसारखीच धातूची आकृती तयार होत असे .
- उदाहरण: मोहेंजोदारोची नृत्य करणारी मुलगी, कालीबंगनची कांस्य बैल
-
Indus Valley Sculptures – नृत्य करणाऱ्या मुलीचे शिल्प (Dancing Girl):
-
- सिंधू सभ्यतेच्या वास्तुकलेचे उमदे उदाहरण म्हणजे अर्थातच धातूपासून बनलेली नाचऱ्या मुलीची (डान्सिंग गर्ल’) मूर्ती.
- ही महिला आकृती मेटल कास्टिंग आणि कलात्मक रचनात्मकतेचे उत्कृष्ट कौशल्य दर्शवते.
- मूर्तीची शरीरबांधणी सडपातळ, रेखीव आणि लयबद्ध आहे
- हि अलंकारांनी सुशोभित नग्न आकृती आहे. तिच्या डाव्या हातात जवळजवळ खांद्यापर्यंत बांगड्या आहेत, जसे की गुजरात आणि राजस्थानातील आधुनिक काळातील आदिवासी लोकांमध्ये आढळते.
- लक्ष वेधणारे दुसरे वैशिष्ट म्हणजे तिची आकर्षक केशरचना! तिचा उजवा हात कंबरेवर आणि डावा हात तिच्या डाव्या मांडीवर असून (त्रिभंग मुद्रा) ती विश्रांतीच्या स्थितीत उभी आहे. कास्टिंग परिपूर्ण आहे. हे त्या काळात मेटल कास्टिंगमधील कलाकारांची अचूकता दर्शवते
- हे शिल्प जरी अंदाजे 4 इंच उंचीचे असले तरी ते खऱ्या उंचीपेक्षा उंच भासते.
3. टेराकोटा:
- धातूच्या शिल्पांबरोबरच मातीपासून बनवलेल्या शिल्पांचेही अवशेष येथे सापडले आहेत. यातील काही सुप्रसिद्ध उदाहरणे म्हणजे मातृ देवी (Mother Goddess), चाक असेलेल्या खेळण्यातल्या गाड्या शिट्ट्या, पक्षी आणि प्राणी इ.
- टेराकोटा म्हणजे शिल्पे बनवण्यासाठी आगीत भाजलेल्या चिकणमातीचा केलेला वापर. कांस्य आकृत्यांच्या तुलनेत, टेराकोटा शिल्पे संख्येने कमी आहेत.
- पिंचिंग (Pinching technique) पद्धतीतील आकृत्या मुख्यतः गुजरात आणि कालीबंगनच्या ठिकाणी आढळल्या आहेत . टेराकोटाचा वापर सामान्यतः खेळणी, प्राण्यांच्या आकृत्या, लघु गाड्या आणि चाके इत्यादी बनवण्यासाठी केला जात असे.
- उदाहरण:मातृदेवी , शिंग असलेल्या देवतेचा मुखवटा इ
-
Indus Valley Sculptures – मातृदेवी (Mother Goddess):
- अनेक स्थळांवर मातृदेवतेच्या आकृत्या सापडल्या आहेत.
- बहुधा समृद्धीसाठी तिची पूजा केली जात असे. ती प्रजननक्षमतेची देवी देखील असू शकते.
- दोन पुरुष आकृत्या – एक लाल वाळूच्या दगडातले धड (torso) आणि स्टॅटाइट मध्ये घडवलेली दाढीवाल्या माणसाची आकृती ही या काळातील महत्वाची शिल्पे आहेत.
- दाढी असलेला पुजारी:
- ही एक दाढी असलेल्या माणसाची प्रतिमा आहे, ज्याने ट्रेफॉइल (Trefoil )ची शाल ओढली आहे ..
- पुजारी ध्यानमुद्रेत लीन असल्याचे दिसते .
- आकृतीच्या उजव्या हातात कडे आहे
- कालीबंगन आणि दायमाबाद येथे धातू-कास्ट शिल्पांची महत्त्वपूर्ण उदाहरणे पाहावयास मिळाली.
- बहुतेक प्रतिमा धार्मिक उद्देशांसाठी वापरल्या गेल्या.
- भांडी बनवण्यासाठी देखील मेटल कास्टिंग प्रक्रिया वापरली जात असे
4. मातीची भांडी (Pottery):
- उत्खननाच्या सापडलेली मातीची भांडी स्थूलपणे दोन प्रकारात वर्गीकृत केली जाऊ शकतात – साधी मातीची भांडी आणि रंगीत मातीची भांडी.
- रंगीत मातीची भांडी प्रामुख्याने लाल आणि काळ्या रंगात रंगवली जात. सहसा पार्श्वभूमी रंगविण्यासाठी लाल रंगाचा वापर केला जाई आणि लाल पार्श्वभूमीवर नक्षी आणि आकृत्या काढण्यासाठी चकचकीत काळ्या रंगाचा वापर केला जात असे.
- झाडे, पक्षी, प्राण्यांच्या आकृत्या आणि भौमितिक नमुने या चित्रांचीपुनरावृत्ती आढळते.
- पॉलीक्रोम पॉटरीची काही दुर्मिळ उदाहरणे देखील सापडली आहेत.
- मातीची भांडी तीन मुख्य कारणांसाठी वापरली गेली:
- साधी भांडी घरगुती वापरासाठी असावीत, मुख्यतः धान्य आणि पाणी साठवण्यासाठी.
- साधारणपणे अर्ध्या इंचा पेक्षा कमी आकाराच्या लघुपात्रांचा वापर सजावटीसाठी केला जात असावा.
- काही मातीची भांडी छिद्रित होती – तळाशी एक मोठे छिद्र आणि बाजूंनी लहान छिद्रे. त्यांचा वापर द्रव पदार्थ गाळण्यासाठी केला गेला असावा .
5. दागिने:
- हडप्पा लोकांनी दागिने बनवण्यासाठी मौल्यवान धातू , रत्ने, हाडे आणि अगदी भाजलेल्या चिकणमातीपर्यंत विविध प्रकारच्या सामग्रीचा वापर केला.
- स्त्रीया तसेच पुरुष देखील दागिने परिधान करीत.हार,बाजुबंद , कडे आणि अंगठ्या असे विविध दागिने उत्खननांमध्ये सापडले आहेत .
- कमरबंद, कानातले आणि पैंजण फक्त महिलाच परिधान करत असत. कॉर्नेलियन, अमेथिस्ट (amethyst), क्वार्ट्ज (quartz), स्टीटाइट ( steatite) इत्यादींपासून बनवलेले मणी बरेच लोकप्रिय होते आणि ते मोठ्या प्रमाणावर बनवले जात असावेत हे चन्हू-दारो आणि लोथल येथे सापडलेल्या कारखान्यांवरून स्पष्ट होते.
- वस्त्र निर्मितीसाठी हडप्पाचे लोक कापूस आणि लोकर (wool) वापरत. त्या काळातील लोक सौंदर्याच्या बाबतीतही जागरूक होते, असा अंदाज केसांच्या आणि दाढीच्या विविध शैलींवरून लावता येतो.
हा लेख देखील वाचा – नागर आणि वेसार मंदिर वास्तुकला
UPSC बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.