बौद्ध शिल्प | Buddhist Sculpture

बौद्ध शिल्प (Buddhist Sculpture)

Buddhist Sculpture , Barhut sculpture, Sanchi sculpture, Gandhar sculpture, Mathura sculpture, Amravati Sculpture, बौद्ध मूर्तिकला, भरहुत स्तूप, सांची स्तूप, गांधार स्तूप, मथुरा मूर्तिकला, अमरावती मूर्तिकला , UPSC notes in Marathi

Buddhist Sculpture – भरहुत शिल्पे

  • भरहुत येथील शिल्पे मौर्य काळातील यक्ष आणि यक्षिणीच्या प्रतिमांसारखी उंच आहेत.
  • कथनांचे चित्रण करणारे रिलीफ पॅनल्स, त्रिमितीयतेचा आभास घडवतात .
  • भरहुतमध्ये, वर्णनात्मक पटल कमी पात्रांसह दाखवले जातात परंतु कालानुरूप कथेतील मुख्य पात्राव्यतिरिक्त, इतर पात्रांची भूमिका महत्त्वाची बनते.
  • उपलब्ध जागेचा शिल्पकार पुरेपूर वापर करतात. 
  • भरहुत, बोधगया, सांची स्तूप-२ आणि जगय्यपेट्टा येथील शिल्पे ही उत्तम शिल्पकलेची उदाहरणे आहेत.
  • कारागिरांनी कथा संवाद साधण्यासाठी चित्रमय भाषेचा प्रभावीपणे केलेला वापर भरहुत येथील कथात्मक रिलीफ्स दर्शवतात. अशाच एका आख्यानात , राणी मायादेवीच्या  (सिद्धार्थ गौतमाची आई) स्वप्नात उतरणारा हत्ती दाखवला आहे

Buddhist Sculpture

Buddhist Sculpture – सांची शिल्पे

  • आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील वेंगी, सांची स्तूप-1 आणि मथुरा शिल्पकलेच्या विकासाचा पुढचा टप्पा शैलीत्मक प्रगतीमध्ये लक्षणीय आहे.
  • यात बुद्ध आणि जातक यांच्या जीवनातील विविध घटनांचे वर्णन करणारी चार सुंदर सजवलेली तोरणे आहेत. सामान्य जीवनाचे चित्रण करणारी शिल्पेही येथे साकारण्यात आली आहेत.
  • कोरीवकामाचे तंत्र भरहुत पेक्षा अधिक प्रगत असल्याचे दिसून येते.
  • कुशीनाराचा वेढा, बुद्धाची कपिलवस्तुला भेट, अशोकाची रामग्राम स्तूपाची भेट यांसारख्या ऐतिहासिक कथनांचे विविध तपशील कोरलेले आहेत.

Buddhist Sculpture – गांधार शिल्पकला 

  • गांधारच्या शिल्पपरंपरेवर बॅक्ट्रिया, पार्थिया आणि स्थानिक प्रदेशाच्या परंपरांचा प्रभाव होता.
  • देशाच्या उत्तर-पश्चिम सीमेवर कुशाण राजघराण्याच्या काळात या परंपरेची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली
  • यात बहुतांशी राखाडी/निळसर राखाडी वाळूचा खडक वापरला गेला 
  • अनेक शिल्पांमागे बौद्ध धर्म ही मुख्य प्रेरणा होती
  • गांधार शिल्पांची वैशिष्ट्ये:
    • बद्धांच्या मुखावर असीमित शांतता दिसून येते 
    • गौतम बुद्धांनी कमीत कमी दागिने परिधान केल्याचे दर्शवण्यात आले आहे . 
    • बुद्धांच्या मस्तकावरील केसांना वेगळे वळण देण्यात आले आहे 
    • मोठे कपाळ आणि मिटलेले डोळे ही ठळक वैशिष्ट्ये दिसून येतात.
    • बुद्धांच्या बसलेल्या प्रतिमा प्रामुख्याने मांडी घालून बसलेल्या दिसतात.
    • बुद्ध आणि बोधिसत्वाच्या प्रतिमांमध्ये ग्रीक देव अपोलो सारखी काही वैशिष्ट्ये आढळतात जसे की रुंद खांदे, डोक्याभोवती शितल प्रभामंडल.
    • स्नायू, नखे, केस यांसारख्या शारीरिक वैशिष्ट्याची रेखाटणे   अतिशय तपशिलाने केली आहेत.

Buddhist Sculpture – मथुरा शिल्पकला

 

  • या शिल्पांच्या चित्रणासाठी ठिपके असलेला वाळूचा खडक हे पसंतीचे माध्यम होते
  • ही शैली पूर्णपणे भारतात विकसित झाली असून बाह्य संस्कृतींचा त्यावर फारसा प्रभाव दिसून येत नाही.
  • मथुरा शिल्पकलेच्या शाखेत जैन, बौद्ध, हिंदू अशा तिन्ही धर्माच्या  कथांचे चित्रण आढळते.
  • कुशाण शासकांनी या शाखेस विशेष प्रोत्साहन दिले 
  • मथुरा येथील स्थानिक शिल्पकलेची परंपरा उत्तर भारतातील इतर भागांमध्ये पसरली
  • या शिल्पकलेची ठळक वैशिष्ट्ये:
    • मथुरेतील बुद्ध प्रतिमा पूर्वीच्या यक्ष प्रतिमांच्या आधारावर  तयार करण्यात आली.
    • गांधार शैलीमध्ये ग्रीक वैशिष्ट्ये आढळतात .
    • आयुधानी सुसज्ज अशा विष्णू आणि शिवाच्या प्रतिमा प्रामुख्याने आढळतात 
    • डावा खांदा झाकण्यासाठी बहुदा वस्त्रांचा वापर करण्यात आला आहे .
    • भगवान बुद्ध ,शिव ,विष्णू ,यक्ष आणि यक्षिणींच्या प्रतिमा हुबेहूब कोरलेल्या आहेत .
    • इसवी सन दुसऱ्या शतकात, मथुरेतील प्रतिमा कामुक झाल्या.
    • बुद्ध प्रतिमांच्या वस्त्रांमध्ये पारदर्शक गुणवत्ता दिसून येते

 

Buddhist Sculpture – अमरावती शिल्पकला 

  • आंध्र प्रदेशातील गुंडलकम्मा नदीच्या काठावर अमरावती शिल्पकले  संबंधित बौद्ध अवशेष सापडले .
  • या कलेचा उगम आंध्र प्रदेशातील अमरावती येथे झाला.
  • या कलेस प्रथम सातवाहनांनी आणि नंतर इक्षवाकूंनी संरक्षण दिले
  • अमरावती, नागार्जुनीकोंडा, घंटासाळ आणि वेंगी अशी प्रमुख ठिकाणी ही शैली विकसित झाली
  • या स्वरूपाच्या शिल्पाची वैशिष्ट्ये:
    • अमरावती कलेमध्ये प्रामुख्याने वापरलेली जाणारी सामग्री म्हणजे ‘पांढरा संगमरवर
    • ही शिल्पे नैसर्गिक पद्धतीने कोरलेली होती. 
    • जातक कथा आणि बुद्धांच्या जीवनावर आधारित कथा दर्शविण्यात आल्या आहेत 
    • बुद्धाचे चित्रण मानव तसेच प्राणी या दोन्ही रूपांत करण्यात आले आहे
    • या शैलीत धार्मिक तसेच धर्मनिरपेक्ष प्रतिमा अस्तित्वात होत्या.
    • अमरावती शैली अधिक शोभिवंत आणि अत्याधुनिक आहे.
    • नृत्य आणि संगीताची असंख्य दृश्ये जीवनातील आनंददायी क्षण दर्शवितात 

 

गुप्त काळातील शिल्पे

  • गुप्त कालखंडास सुवर्णयुग मानले जाते.
  • या काळात अतिशय अद्वितीय शैलीचा उगम झाला.

गुप्त शिल्पाची वैशिष्ट्ये

 

  • मानवी आकृत्यांच्या प्रतीमा हे गुप्त शिल्पशैलीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
  • मानवी आकृत्यांमधील शारीरिक वैशिष्टयांचे आणि कोमलतेचे अतिशय बारकाईने चित्रण केले आहे ,
  • मानवी प्रतिमा निरनिराळ्या वस्त्र आणि दागिन्यांनी अलंकृत केलेल्या आढळतात.
  • शक्यतो या शैलीत नग्नता वगळण्यात आली .
  • मथुरेतील गौतम बुद्धांची अभय मुद्रेतली भव्य मूर्ती ही ५ व्या शतकातील असून ती वाळूच्या दगडापासून बनवलेली आहे  
  • गुप्त शैलीतील गौतम बुद्धांच्या प्रतिमेतील मुद्रेवरचे तेज व असीम आत्मिक समाधान , सियाम, कंबोडिया, ब्रह्मदेश, जावा, मध्य आशिया, चीन आणि जपान अशा इतर काही  देशांमध्ये आढळणाऱ्या मूर्तींमध्ये देखील पहावयास मिळते 
  • सारनाथ येथील गौतम बुद्धांची उभ्या स्थितीतील मूर्ती हे गुप्त कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या मूर्तीवर डायफॅनस झग्याची झालर दर्शविली आहे.
  • देवगड येथील मंदिरांतील दगडी कोरीव काम आणि उदयगिरी व अजिंठा येथील मंदिरे ही त्यांच्या सजावटपूर्ण मांडणीच्या आकृतीशिल्पाचे उत्कृष्ट नमुने आहेत. 
  • देवगड मंदिरातील शिल्पांमधे शेश शयनी विष्णूचे फलक हे विश्वाचे विघटन आणि त्याची नवीन निर्मिती यांच्या दरम्यानच्या मध्यंतरात अनंतकाळचे प्रतीक असलेल्या नाग अनंतावर जागृतपणे झोपलेल्या परमात्म्याचे प्रतिनिधित्व करत आहेत

 

हे पण वाचा – सिंधू संस्कृतीची शिल्पे

UPSC बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

Leave a Reply